शिळा भात खाण्याचे ५ फायदे तुम्हांला धक्का देईल


अनेकवेळा रात्री आपल्या घरात भात उतरतो, आपण तो शिळा झाला असे समजून गाईला किंवा इतर प्राण्यांना खायला घालतो.  जास्त जास्त आपण फेकून देतो. आता तुमच्या घरी रात्री भात उरला असेल तर त्याला फेकू नका. कारण शिळा भात आरोग्यासाठी एक खजिना आहे. 

काय करावे 

घरात भात उरला असेल तर त्याला फेकण्याऐवजी त्याला एका मातीच्या भांड्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळपर्यंत हा भात फर्मेंट होतो. या भाताला तुम्ही कच्च्या कांद्यासह सकाळी ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकतात. हा तुमचा फेवरेट ब्रेकफास्ट नसेल पण शिळ्या भाताला अशा पद्धतीने खाण्याचे खूप फायदे आहे.

शिळा भात खाण्याचे फायदे

१. शिळा भात खाल्याने शरीर थंड राहते. रोज शिळा भात खाल्ला तर तुमच्या शरिराचे तापमान कंट्रोलमध्ये राहते.
२. भातात भरपूर प्रमाणात फाइबर्स असतात, त्यामुळे बद्धकोष्टची तक्रार दूर होते.
३. शिळा भात तुम्हांला दिवसभर ताजेतवाने ठेवतो. यामुळे दिवसभर काम करण्याची एनर्जी मिळते.
४. तुम्हांला अल्सरची समस्या असेल तर आठवड्यातून तीनवेळा शिळा भात खा. तुमचा अल्सर नक्की बरा होईल.
५. तुम्हांला जास्त चहा किंवा कॉफी पिण्याचे सवय (व्यसन) आहे तर सकाळी उठल्यावर भात खाल्ल्याने तुमची ही सवय कमी होऊ शकते.

डार्क चॉकलेट खाल्ल्याने होतात अनेक फायदे



 तुम्हालाही चॉकलेट खाणे आवडत असेल तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे.
नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार रोज डार्क चॉकलेटचा एक तुकडा खाल्ल्यास डायबिटीज तसेच हृद्यासंबंधित आजारांचा धोका कमी होतो.

या संशोधनादरम्यान १८ ते ६९ या वयोगटातील एक हजार १५३ लोकांचे निरीक्षण करण्यात आले. या निरीक्षणादरम्यान ज्यांनी नियमित १०० ग्रॅम चॉकलेट खाल्ले त्यांच्यात डायबिटीज तसेच हृद्यासंबंधित आजारांचा धोका कमी आढळून आला.
कोकोपासून बनवण्यात आलेली उत्पादने कार्डिओ मेटाबॉलिकचे स्वास्थ सुधारण्यास मदत करतात असेही या संशोधनादरम्यान आढळून आलेय.

उन्हाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी


 उन्हाळ्यात जसे तुम्ही आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेता त्याचप्रमाणे डोळ्यांची काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. या उन्हाळ्यात पारा ५०अंशाच्या वर गेला आहे अशा परिस्थितीत त्वचेबरोबरच डोळ्यांची काळजी घेणे ही तितकेच गरजेचे असते. उन्हाळ्यात धूळ, मातीमुळे डोळ्यांचे आजार होऊ शकतात.
तुम्हाला माहीत आहे का सूर्यापासून येण्यारे अल्ट्राव्हायलेट किरणे डोळ्यांकरिता किती हानिकारक आहेत? या किरणांमुळे मेलानोमा किंवा लायमोफोमासारखे डोळ्यांचे आजार होऊ शकतात. ही अल्ट्राव्हायलेट किरणे प्रकाशाहून अधिक वेगाने येतात व फक्त उन्हातच नाही तर सावलीत देखील असतात ज्यामुळे डोळ्यांशी निगडीत आजार होण्याची शक्यता असते.
यावर उपाय म्हणून उन्हात फिरतांना सनग्लासेस जरूर लावा जे तुमच्या डोळ्यांचे अल्ट्राव्हायलेट किरणांपासून संरक्षण करेल. केवळ उन्हात फिरतांनाच नाही तर सावलीत देखील सनग्लासेस लावा.
एरव्ही फॅशनकरिता वापरल्या जाणाऱ्या हॅट्स देखील तुम्हाला या हानिकारक किरणांपासून सुरक्षित ठेवतात. उन्हाळ्यात शक्य होईल तितके जास्त पाणी पिणे ज्यामुळे शरिरातील पाण्याचे प्रमाण योग्य तेवढे राहते आणि यूव्ही किरणांच्या घातक परिणामांपासून आरोग्याचे संरक्षण करते.
शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे डोळ्यांत ल्युब्रिकेशनची कमतरता भासते ज्यामुळे जिरोफ्थलमिया (डोळे कोरडे) होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या, सनग्लासेस व हॅट जवळ ठेवा. तसेच डोळ्यांच्या समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.

ब्युटी प्रॉडक्ट आहे टीबॅग...हे आहेत ६ फायदे

 

टीबॅगचे असेही फायदे

उन्हाळ्याच्या दिवसात सनबर्नची समस्या अधिक होते. यावेळी ज्या ठिकाणी सनबर्न झालेय त्या ठिकाणी टीबॅग ठेवा. यामुळे नक्की फायदा होईल. 
अनेकांची नखे फार कमकुवत असतात. त्यामुळे ती सतत तुटत असतात. यावर टीबॅगेचा वापर गुणकारी ठरतो. 
त्वचेवर शेव्हिंगमुळे रॅशेस आल्या असतील तर त्या घालवण्यासाठी टीबॅगचा वापर होतो.
चेहऱ्यावर मुरुमे अथवा डाग असतील त्यावर ग्रीन टीचा पर्याय उत्तम आहे. 
केसांना चमक आणण्यासाठीही ग्रीन टी अथवा ब्लॅक टीचा वापर होऊ शकतो. टीबॅग बुडवून ठेवलेले पाणी काही वेळ केसांना लावून धुतल्यास केसांना चमक येते.
डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल आल्यास थंड टीबॅग डोळ्यांवर ठेवल्याने फायदा होतो. यातील कॅफेन डोळ्यांखालील डार्क सर्कल कमी कऱण्यास मदत होते.

सिगारेटमुळे होते कोट्यावधींचे नुकसान


तीस वर्षांची व्यक्ती दिवसाला पाच सिगारेट ओढत असेल तर ६० व्या वर्षापर्यंत सिगारेटचे व्यसन आणि त्याच्या जोडीने येणाऱ्या आजारांमुळे एका व्यक्तीला तब्बल १ कोटी रुपयांचा खर्च होऊ शकतो असा धक्कादायक निष्कर्ष 'ईटी वेल्थ'च्या अभ्यासातून समोर आलाय. म्हणजेच एका सिगरेटमुळे तुम्ही 12 मिनिटांचं आयुष्य गमावता.
३१ मे रोजी तंबाखू विरोधी दिवस पाळला जातो त्या निमित्ताने याबाबत अभ्यास केला असता ही माहिती समोर आलीये. सिगारेटच्या व्यसनाने जीवघेण्या आजारांना आमंत्रण मिळतेच पण तुमचा खिसाही चांगलाच कापला जातो असे वास्तव 'ईटी वेल्थ'ने समोर आणलेय. सिगारेटमुळे तुमच्या खिशाला कसा खर्चाचा फटका बसतो, हे जाणून घेऊया...
सिगारेट खरेदीवरील खर्च
साधारणपणे एका सिगारेटची किंमत १० ते १५ रुपये असते. जर एका सिगारेटची किंमत सरासरी १२ रुपये धरली तर त्यानुसार दररोज पाच सिगारेटसाठी ६० रुपये लागतील. म्हणजेच महिन्याला १८०० रुपये खर्च येईल. अशाप्रकारे ३० वर्षे सिगारेट ओढल्यास २४.४७ लाख रुपये खर्च होतील. हेच पैसे जर कुठे गुंतवले तर ९ टक्के व्याजाने त्याचे ६९ लाख २३ हजार रुपये तुम्हाला मिळतील.
उपचारांवर खर्च
सिगारेटच्या व्यसनाने आजारांनाही आमंत्रण मिळते. सिगारेटच्या व्यसनामुळे श्वासाचे, फुफ्फुसांचा कर्करोग, हृदयविकार, अस्थमा यांसारखे आजार झाल्याचे आपण ऐकलेच असेल. अशा व्यसनी लोकांना दरमहिन्याला साधारण ४०० रुपये औषधोपचारावर खर्च करावे लागतात. ज्याची ३० वर्षांत ११ लाख ५९ हजार इतकी रक्कम होते. हेच पैसे जर गुंतवले असते तर ३० वर्षांत व्याजासकट २६.७० लाख रुपये मिळू शकले असते.
विमाही पडतो महागात
सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तींना विमा कंपन्या नेहमीच 'हाय रिस्क' प्रकारात धरतात. त्यामुळे या व्यक्तींकडून विम्याचा जास्त हप्ता घेतला जातो.
कुटुंबावरही परिणाम
सिगारेटचे व्यसन असणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबालाही या व्यसनाचे परिणाम भोगावे लागतात. विशेषत: लहान मुलांना सिगारटेच्या धुराचा फटका बसतो. त्यांची तब्येत बिघडल्यास तेदेखील फार खर्चिक ठरते.

कसा दूर कराल ओठांचा काळेपणा ?


या उपायांनी ओठांचा काळेपणा होईल दूर
१. साखर आणि मध याचा पॅक किंवा काही ग्लास पाणी हे फारच उपायकारक असते.
२. एसपीएफ २० असलेलले लिप बाम अथवा लिपस्टिकचा वापर करा.
३. मध आणि साखर याचा पॅक ओठावरील कोरडी त्वचा घालवण्यास मदत करेल.
४. पाणी कमी पित असल्यास ओठ काळे पडू शकतात. त्यासाठी दिवसातून किमान रोज आठ ग्लास पाणी पिणं गरजेचे आहे.
५. रोज रात्री आपल्या ओठांवर लिंबू, बटाटा आणि बीट याचा रस लावावा. सकाळी ते धुवून टाकावे.
६. बदामाचे तेल ओठांवरील मुलायमपणा कायम ठेवते.

लाल लिची मागचं काळं सत्य


 उन्हाळ्याच्या या सिझनमध्ये तुम्हाला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर लिची दिसत असेल. उन्हाळ्यामध्ये लिची खाणं आरोग्याला चांगलं असतं असा सल्ला डॉक्टर देतात, पण जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हा लिची विकत घेण्याआधी नक्कीच विचार कराल.
लीचीच्या लाल रंगाकडे पाहून तुम्हालाही ती घ्यायची इच्छा होत असेल, पण या व्हिडिओमध्ये लिचीला स्प्रेनं लाल रंग देताना हा लिचीविक्रेता दिसत आहे. याबाबत त्याला विचारलं असता, लिचीची मागणी लक्षात घेता लाल रंगाचा स्प्रे मारत असल्याचं त्यानं निर्लजपणे कॅमेरासमोरच कबूल केलं आहे.

दिवसातून एखादी डुलकी घेणे आरोग्यासाठी फायदेशीर


साधारणपणे कामादरम्यान डुलकी लागल्यास हे आळशीपणाचे लक्षण मानले जाते. मात्र हे आळसपणाचे लक्षण नव्हे तर चांगल्या आरोग्याची निशाणी आहे.
आरोग्यासंबंधित एका रिपोर्टनुसार, दिवसातून लहानशी झोप घेणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. वैज्ञानिकांच्या मते, डुलकीमुळे आपण अधिक सतर्क होतो तसेच स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
रिपोर्टनुसार, एक तृतीयांश अमेरिकन लोक दिवसातून एखादी डुलकी घेतात. यामुळे त्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम दिसून येतोय. त्यामुळे कामाच्या ठिकाणी दमला असाल तर दिवसातून एखादी डुलकी घेण्यास हरकत नाही. तसेच डुलकी घेण्याआधी चहा अथवा कॉफीचे सेवन करणेही चांगले.

कान साफ करण्याचे ५ सोपे उपाय

 

कान साफ करण्याचे ५ सोपे उपाय :

१. कोमट पाणी : कापूस घेऊन तो पाण्यात भिजवून त्याने पाणी कानात टाका. काही सेकंदात पाणी बाहेर काढा.
२. हायड्रोजन पराक्साइड : अतिशय कमी प्रमाणात हायड्रोजन पराक्साइड घेवून तो पाण्यात टाका. थोड्या प्रमाणात ते कानात टाका आणि आता कान उलटून काही सेकंदात ते बाहेर काढा.

३. तेल : ऑलिव्ह, शेंगदाणा किंवा मोहरीचं तेल गरम करुन कानात टाकणे हा देखील सोपा उपाय आहे. तेलात जरासं लसूण टाकला तरी चालतो. यामुळे मळ बाहेर पडतो.
४ कांद्याचा रस : कांदा वाफेवर शिजवून किंवा भाजून याचा रस काढून घ्या. त्यानंतर कापसाने रसाचे काही थेंब कानात टाका. याने मळ बाहेर पडतो.
५. मिठाचे पाणी : गरम पाण्यात मीठ घोळून टाकून त्याचे काही थेंब कानात टाका आणि काही सेकंदात ते बाहेर काढा.

करपलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी ५ टिप्स


१. करपलेल्या भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा टाका. त्यात दोन चमचे लिंबाचा रस आणि २ कप गरम पाणी टाका. हे मिश्रण घेऊन काथ्याने भांडे घासा.
२. एक कच्चा लिंबू घेऊन करपलेल्या भांड्यात रगडा. त्यानंतर गरम पाणी टाका.
३. करपलेल्या भांड्यात मीठ आणि पाणी टाकून ते चांगले उकळवा. त्यानंतर घासणीने भांडे स्वच्छ करा.
४. करपलेल्या भांड्यात पाणी घेऊन त्यात कांद्याचे छोटे तुकडे टाकून उकळून घ्या. काही वेळातच करपलेले तुकडे पाण्यावर तरंगतील.
५. अमोनिया आणि पाणी मिक्स करुन ते करपलेल्या भांड्यात टाकून उकळवा. गरम झाल्यानंतर ब्रशने भांडे साफ करुन घ्या.

तरूण महिलांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण










एकूण कर्करोगग्रस्त महिलांपैकी ४६ टक्के महिला या ५० वर्षांखालील वयाच्या असल्याचे आढळून आले आहे. सतत बदलत्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
उशिरा लग्न करणे, एकापेक्षा अधिक पुरूषांशी शरीरसंबंध ठेवणे किंवा उशिरा गरोदर राहणे यांसारख्या गोष्टीही कर्करोगवाढीसाठी कारणीभूत आहेत. 25 ते 40 वयोगटातील रूग्णांचे प्रमाण सध्या वाढत असून ही धोक्याची घंटा असल्याचे इंद्रप्रस्थ अपोलोचे सीनियर कन्सल्टंट डॉ. समीर कौल यांचे म्हणणे आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेंशन अँड रिसर्चच्या रिपोर्टनुसार गर्भाशयाच्या कर्करोगामुळे भारतात दर आठ मिनिटांना एका महिलेचा मृत्यू होतो. त्यामुळे कोणतीही जखम, खोकला, ताप, रक्तस्त्रावातील बदल या गोष्टींसाठी महिलांनी तत्काळ उपचार घेणे गरजेचे आहे. यामुळे कर्करोगाचा धोका कमी करता येऊ शकतो.

५ मिनिटांत दूर होतील ब्लॅकहेड्स


चेहरा गोरा असे वा सावळां प्रत्येकाला सतावणारी चेहऱ्याची समस्या म्हणजे ब्लॅकहेड्स. यामुळेच चेहऱ्यावर निस्तेजपणा वाढतो तसेच चेहऱ्यावरील छिद्रे मोठी झाल्याने पिंपल्सची समस्या उद्भवू शकते. तुम्हालाही ब्लॅकहेड्सची समस्या असेल तर हे आहेत त्यासाठी ५ घरगुती आणि फायदेशीर उपाय.
तांदळाचे पीठ,ग्रीन टी आणि दूध - एका वाटीत तांदळाचे पीठ आणि ग्रीन टी बॅग टाकून चांगले मिक्स करा. त्यात दोन चमचे दूध टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. हे मिश्रण स्क्रबप्रमाणे ५ मिनिटे चेहऱ्यावर चोळा. पाण्याने चेहरा धुतल्यानंतर हायड्रेटिंग क्रीमचा वापर करा.
साखर, लिंबू आणि मध - एक चमचा ब्राऊन अथवा व्हाईट शुगरमध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिक्स करा. चेहऱ्यावर पाच ते दहा मिनिटे चोळा. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतील तसेच ब्लॅकहेड्स निघून जातील.
मध, बदाम आणि लिंबू - एका वाटीत एका बदामाची पूड, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळा. स्क्रबप्रमाणे चेहऱ्यावर लावा. ब्लॅकहेड्स दूर होण्यास या स्क्रबचा फायदा होतो.
ओटमील, दही, हळद आणि मध - एक चमचा ओटमील, एक चमचा दही, चिमूटभर हळद आणि एक चमचा मध एकत्रित मिसळा. चेहऱ्यावर हा स्रब लावून पाण्याने चेहरा धुवा.
सैंधव, लिंबाचा रस आणि मध - एक चमचा सैंधव, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिक्स करा. चेहऱ्यावर पाच ते सहा मिनिटे चोळा. त्यानंतर चेहरा धुवा.

तांदळाचे हे आहेत अनेक फायदे


चेहऱ्यावरील डाग दूर होतात - चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी उपयोगी आहे तांदूळ. तांदूळ बारीक वाटून घ्या. वाटलेल्या तांदुळाच्या पिठीमध्ये थोडेसे पाणी मिसळून ही पेस्टर चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होतात.
डोकेदुखीसाठी फायदेशीर - डोकेदुखीचा त्रास होत असल्यास शिजलेल्या भाताच्या पाण्यात एक चिमूट सुंठ पावडर मिसळून डोक्यावर लावा. यामुळे डोकेदुखीपासून सुटका होते.
जुलाबाचा त्रास होतो दूर - जुलाबाचा त्रास होत असल्यास तांदूळ बारीक वाटून घेऊन ते पाण्यात उकळवा. यात मीठ टाकून ही पेज प्या. यामुळे जुलाबाचा त्रास कमी होतो.
सतत तहान लागणे - सतत तहान लागत असेल तर तांदुळाचे दाणे दिवसातून दोन-तीन वेळा चावून चावून खा. यामुळे तहान लागणे कमी होते.

केसगळतीवर फायदेशीर आहे कलौंजीचे तेल



 आपल्या किचनमध्ये असे अनेक पदार्थ असतात जे केवळ पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठीच नव्हे तर त्यात औषधी गुणधर्मही असतात. यापैकीच एक म्हणजे. कलौंजी. 
कलौंजीच्या बियांचा उपयोग लोणच्याचा स्वाद वाढवण्यासाठी केला जातो. कलौंजीच्या बीमध्ये औषधी गुणधर्म असतात. तसेच केसगळतीवर सर्वात उत्तम आहे कलौंजीचे तेल. केसगळती रोखायची असल्यास कलौंजीच्या तेलाचा वापर केल्यास फायदा होतो.
यासाठी एक चमचा कलौंजीच्या तेलात दोन चमचे कस्टर्ड ऑईल आणि बदामाचे तेल मिसळा. या मिश्रणाने केसांच्या मुळांशी मसाज करा. काही दिवसांतच तुमची केसगळती थांबेल
केवळ केसगळती रोखण्यासाठीच नव्हे तर डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठीही कलौंजीच्या तेलाचा वापर होतो. चहामध्ये कलौंजीचे तेल टाकून प्यायल्यास डायबिटीस रुग्णांची शुगर नियंत्रणात राहते.

काजूचे आश्चर्यकारक आरोग्यवर्धक फायदे








काजूचे आश्चर्यकारक आरोग्यासाठी फायदे आहेत. सुका मेव्यामध्ये काजूला प्राधान्य असते. काजू जगात आरोग्यवर्धनक पदार्थ मानले जाते. काजूत प्रोटीन (प्रथिने), व्हिटॅमिन, लोह आणि अॅंटीऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त असते.
काजूत प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अॅंटीऑक्सीडेंट असल्यामुळे रोजच्या खाण्याच्या पदार्थात काजूला प्राधान्य दिले पाहिजे.
निरोगी हृदयासाठी 
काजू आपल्या हृदयासाठी खूप फायदेशील आहे. काजू हा नैसर्गिक कोलेस्ट्राल फ्री आहे. हेल्दी हार्ट फॅट्स, फायबरयुक्त, प्रोटीन आणि आर्जीनिसयुक्त परिपूर्ण आहेत. त्यामुळे रक्तवाहिन्यातील अडथळा दूर करतो.
हाडे मजबूत होण्यास मदत
काजूत मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम, मॅग्निशिअम आणि पॉटेशिअम भरपूर असते. त्यामुळे हाडांची झिज रोखण्यास काजू मदत करतो. काजूत प्रथिने जास्त प्रमाणात असल्याने हाडांचे आरोग्य चांगले राहते.
डोळ्यांचे आरोग्य
काजूत ल्यूटेन आणि जियाएक्सांथिन (एंटीऑक्सीडेंट) चांगल्याप्रमाणात मात्रा असते. त्यामुळे डोळ्यांची नजर कमी होण्यापासून बचाव होता. मोती बिंदू होण्यापासून काजू सुटका करते.
रक्त रोग
काजूत कॉपरची मात्रा जास्त असते. त्यामुळे आपले रक्त रोगांचा मुकाबला करण्यासाठी मदत करते. रक्तात कॉपरची मात्रा तसेच लोह कमी असेल तर एनिमिया रोग होऊ शकतो. त्यामुळे काजू खाणे महत्वाचे असते.
वजन कमी करण्यास मदत
करण्यात आलेल्या संशोधनानंतर काजूमुळे वजन नियंत्रणात राहते. काजूत कोलेस्ट्रॉल कमी असल्याने चरबी देखील वाढत नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

छोटी वेलची मोठ्या कामाची


 पदार्थाचा गंध वाढवण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो. तसेच मुखवासमध्ये वेलचीचा समावेश असतो. वेलचीमध्ये व्हिटामिन ए, बी, सीच्या व्यतिरिक्त मँगनीज आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की वेलचीमध्ये अनेक ब्युटी फायदेही असतात.
चांगल्या ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये त्वचा आणि केसांसाठी बनवण्यात येणाऱ्या लोशनपासून ते फेशियल ऑईल्ससारख्या अनेक प्रॉडक्टमध्ये वेलचीचे तेल वापरले जाते.
वेलचीच्या इसेंशियल आईलचा वापर तुम्ही दररोज क्लिंझरसारखा करु शकता. त्वचेवरील छिद्रे साफ होतात तसेच चेहऱ्यावरील डागही कमी करण्याचे काम हे तेल करते. यासाठी तेलाचे काही थेंब चेहऱ्याला लावून 2 मिनिटे मसाज करे.
वेलचीचा मास्क चेहऱ्यावरील पिंपल्स तसेच डाग दूर करण्यास फायदेशीर ठरतो. वेलची पावडरमध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळा. ज्या ठिकाणी पिंपल्स आण पिंपल्सचे डाग आहेत त्या ठिकाणी ही पेस्ट लावा. 10 मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवा.
वेलचीचे तेल इन्फेक्शन घालवण्यासही उपयोगी आहे. स्काल्पवर झालेले इन्फेक्शन दूर करण्यासाठी तसेच केसातील कोंडा घालवण्यासाठी वेलचीचे तेल केसांच्या मुळाशी लावा. यामुळे केस मजबूत तसेच चमकदार होतात.

क्रिम-पावडर न लावता घरच्या घरी बनवा चेहरा उजळ


आता क्रिम-पावडर न लावता घरच्या घरी तुम्ही हे सोपे उपाय करा. यामुळे त्वचा उजळण्यास मदत होईल.
हे उपाय तुमच्या त्वचेला बनवतील उजळ आणि देतील कोमल त्वचा..
1. व्यायाम: दररोज व्यायाम केल्याने चेहरा उजळेल आणि व्यायाम शरीरासाठी सुध्दा फायदेशीर आहे.
2. चालणे-फिरणे: सकाळी आणि संध्याकाळी मोकळ्या हवेत फिरावे, त्याने त्वचा उजळण्यास मदत होईल. आणि त्वचेला ऑक्सिजन मिळाल्याने चेहरा सुंदर दिसेल.
3. पाणी: पाणी जास्त पियावे त्याने अनेक आजार दूर होतात. पाणी आपल्या शरीराला हाइड्रेटेड करतो, त्यामुळे आपला चेहरा चमकदार होतो.
4. स्वच्छता: दिवसभर बाहेर असल्यामुळे चेहऱ्यावर बसणारी धूळ, मातीमुळे त्वचा काळी पडते, त्यामुळे दर 2-3 तासाने चेहरा धुवून स्वच्छ करावा.
5. आहार: आहारात जास्त तेलकट तिखट पदार्थ खाणे टाळावे. फळ, पालेभाज्यांचा समावेश आहारात करावा.

छोट्या ओव्याचे 5 मोठे फायदे


 प्रत्येकाच्या घरात ओवा एक मसाल्याच्या स्वरुपात असतो. याचा वापर आपण अनेकवेळा जेवनामध्ये करतो आणि ओवा हे एक प्राकृतिक औषध पण आहे.
घरगुती उपाय करुन तुम्ही छोट्या-छोट्या आजारांवर घरीच उपचार करु शकता. ओवा हा पदार्थ आपल्या शरीरातील अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत करतो.
या आजारांना झटपट बरं करतो ओवा...
1. रोज थोडा ओवा खाल्ल्याने हृद्याच्या आजारांचा धोका कमी होतो.
2. किडनी स्टोनपासून सुटका होण्यासाठी ओवा फायदेशीर ठरतो.
3. सर्दी असेल तर पाण्यात थोडा ओवा टाकून ते पाणी उकळून पिल्याने किंवा ओव्याची धुरी घेतल्याने सर्दी ताबडतोब बरी होते.
4. ओव्याचे पाणी दातदुखीसाठी फायदेशीर असते. या पाण्याचे रोज सेवन केल्याने तोंडातून येणारी दुर्गंधीपण दूर होते.
5. ओवा रोज जेवनानंतर खाल्ल्याने पोटातला गॅस कमी होतो.

जपानी महिलांच्या सुंदरतेचं हे आहे रहस्य









जगात वेगवेगळ्या रंग-रुपाचे लोक पाहायला मिळतात. वेगवेगळ्या ठिकाणी संस्कृती, चाली-रिती, राहणीमान हे वेगवेगळं असतं. जपान हे देखील एका वेगळ्या संस्कृतीसाठी ओळखला जातो. जपानच्या महिला देखील त्यांच्या सुंदरतेमुळे प्रसिद्ध आहेत. जगभरात जपानच्या महिला त्यांच्या सुंदरतेमुळे आकर्षणाचं केंद्र ठरतात.
प्रत्येक जपानी महिला आपली सुंदरता कायम ठेवण्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या कोणत्याच वस्तूंचा वापर करत नाहीत. पाहा मग काय आहे त्यांच्या सुंदरतेचं रहस्य.

जपानी महिलांच्या सुंदरतेचं रहस्य आहे त्यांचा आहार. जपानी महिला मोठ्या प्रमाणात फळ, हिरव्या भाज्या, मासे खातात. यांच्या सेवनाने शरीराला मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडेंट, विटामिन ई आणि ओमेगा-३ मिळतं. ज्यामुळे त्यांची स्किनवर देखील नॅचरल ग्लो येतो.
जपानी महिला रोज एक खास प्रकारचं नॅचरल ऑईल वापरतात. ज्यामुळे त्यांची स्किन मॉस्चराईज राहते. यासाठी ते रोज अॅसेंशियल ऑईल जसं की, चंदनाचं तेल आणि लेवेंडर ऑईलने बॉडी मसाज करतात.
जपानी महिला लोशन मास्क नामक एक टोनरचा देखील वापर करतात. यामुळे त्याच्या स्किनला सुरकत्या नाही पडत. कापूस किंवा कॉटनच्या कपड्याने हे लोशन चेहऱ्याला लावतात. त्यानंतर कमीत कमी १० मिनिटं चेहरा झाकून ठेवा.

बाहेर पैसे घालवण्यापेक्षा घरातचं बनवा पौष्टिक बर्गर


बर्गर हा प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ आहे. बाहेरच्या स्टॉलवर आपण आवडीने बर्गर खात असतो. आता बाहेर पैसे घालवण्यापेक्षा घरातचं सोप्या पध्दतीने पौष्टिक बर्गर बनवा.
घरात बनवलेल्या बर्गर हा आरोग्यासाठी चांगला असतो.
बर्गर

दोन आठवडे नियमित नारळपाणी पिण्याचे फायदे


 नारळपाणी पिणे शरीरासाठी नेहमीच फायदेशीर असते. इतर कोणतेही सॉफ्ट ड्रिंक घेण्यापेक्षा नारळपाणी घेणे कधीही उत्तम. नारळपाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. 
हायड्रेशन कमी करण्यासाठी - हायड्रेशनची समस्या जाणवत असेल तर इतर कोणतेही कोल्ड्रिंक्स घेण्यापेक्षा नारळपाणी घेणे उत्तम. यात मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखी खनिजे असतात. 
मेंदू आणि मसल्ससाठी नारळपाणी चांगले - एक कप नारळपाण्यात 295 मिलिग्रॅम पोटॅशियम असते. हृद्याच्या ठोक्यांच्या नियमिततेसाठी पोटॅशियम हे खनिज गरजेचे असते. 
अँटीएजिंग - नारळपाणी प्यापल्याने अँटीएजिंगची समस्या दूर होते. 
पचनक्रियेसाठी उत्तम - सलग 14 दिवस नारळपाणी प्यायल्यास पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात. 
रोगप्रतिकारक क्षमता वाढते - नियमितपणे नारळपाणी प्यायल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. 

चामखीळ घालवण्यासाठी ६ घरगुती उपाय


स्‍कीन ट्यूमरच्या नावाने देखील हा ओळखला जातो. अनेकदा त्‍वचेवरील असमान वृद्धीमुळे देखील शरिरावर मोस तयार होतात. काही घरगुती उपायांनी तुम्ही देखील ते शरिरावरुन नाहीसे करु शकतात.
मोस नाहीसे करण्यासाठी ६ उपाय
१. सफरचंदचं व्हिनेगर : मोसच्या समस्या मुळापासून दूर करण्यासाठी हे अधिक फायदेशीर असतं. रोज कमीत कमी ३ वेळा कापसाने मोसवर हे व्हिनेगार लावा आणि कापूस त्यावर लावून ठेवा. काही दिवसानंतर मोसचा रंग बदलेल आणि तो सुखत जाईल. या शिवाय तुम्ही अॅलोविराचं जेल देखील लावू शकतात.
२. लिंबाचा रस : लिंबाचा रस मोसच्या जागेवर लावल्याने याची समस्या दूर होते. कापसाने लिंबूचा रस मोसवर लावा आणि त्यावर कापूस तसाच ठेवून द्या.
३. बटाट्याचा रस : बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करुन मोसच्या जागी लावल्याने हळूहळू कमी होण्यास मदत होते.
४. अननसाचा रस : मोसपासून सुटका मिळण्यासाठी तुम्ही अननस रस, फ्लॉवर रस, कांद्याचा रस आणि मध वापरु शकता. कारण या सगळ्यांमध्ये मोसला नाहीसा करण्यासाठीचं ऐजाईम्स असतात.
५. बेकिंग सोडा : चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा मोसवर देखील फायदेशीर आहे. बेकिंग सोडा ऐरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि मोसवर ती पेस्ट लावा. काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसेल.
६. लसून : लसूनचं सेवन अनेक समस्यांपासून लांब राहण्यासाठी महत्त्वाचं आहे. सुंदरतेसाठी देखील लसून तेवढाच फायदेशीर आहे. लसूनच्या पाकळ्या मोसवर घासा किंवा त्याची पेस्ट मोसवर लावा. असं केल्यास काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.

सतत एसीमध्ये बसण्याचे हे आहेत दुष्परिणाम


सांधेदुखी : एसीमधून निघणाऱ्या हवेमुळे सांधेदुखीचे आजार सतावतात. 
अॅलर्जीची समस्या - सतत एसीमध्ये बसून राहिल्याने तुम्हाला अॅलर्जी, सर्दी-खोकल्यासारखे आजारही होऊ शकातत. याचे मुख्य कारण म्हणजे एसीमधील फ्लिटर बऱाच काळ साफ केले जात नाही. त्यामुळे त्यातून निघणाऱ्या बॅक्टेरिया आणि धुळीमुळे अॅलर्जी होण्याचा धोका असतो.
थकवा - एसीचे तापमान खूपच कमी असते. ज्यामुळे शरीराला तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. यामुळे शरीरात थकवा निर्माण होतो.
त्वचा कोरडी होणे - सतत एसीमध्ये बसून राहिल्याने त्वचा कोरडी पडते. एसीमध्ये नॅचरल हवा बाहेर निघत नाही त्यामुळे त्वचा कोरडी होते. 
सायनस - एका संशोधनादरम्यान असे समोर आलेय की, जे लोक सतत 4-5 तास एसीमध्ये बसून असतात त्यांना सायनसची समस्या जाणवते. 

हे 10 पदार्थ कच्चे खाऊ नका


चांगल्या आरोग्यासाठी रोजचा आहार आपण काय घ्यावा? याची प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे.
तर निरोगी राहण्यासाठी हे 10 पदार्थं कच्चे खाऊ नका
1. राजमा: शिजवलेला राजमा खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.
2. काजू: कच्चे काजू पेक्षा भाजलेले काजू चवदार आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
3. मांस: मांस नेहमी स्वच्छ धुवून शिजवून खाणे आरोग्यासाठी योग्य आहे.
4. मूग: मोड आलेले मूग शिजवून किंवा थोडस तेल टाकून भाजून खावेत. कच्चे मूग खाल्ल्याने शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता कमी होते.
5. टोमॅटो: टोमॅटो कच्चे न खाता थोडसं शिजवून खावेत. त्याने आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाही.
6. हिरव्या भाज्या: सगळ्या हिरव्या भाज्या नेहमी स्वच्छ धुवून शिजवाव्यात किंवा थोड्याश्या तेलात भाजून घेतल्याने शारीरीक समस्या होत नाहीत.
7. मशरूम: कच्चे मशरूम शरीरासाठी धोकादायक असतात, त्यासाठी मशरूम नेहमी शिजवून घ्यावेत.
8. बदाम: कच्च्या बदामापेक्षा भाजलेले बदाम खाण्यासाठी जास्त चवदार असतात.
9. दूध: उकळलेलं दूध शरीरासाठी पौष्टिक असते.
10. अंडी: चांगल्या आरोग्यासाठी अंडी उकडून खावीत.

शरीरातील या 7 भागांवर आलेली सूज दुर्लक्षित करू नका


हे आहेत ते 7 भाग आणि यांच्यावरील सुजचे परिणाम
1. पाय : पायावर येणाऱ्या सुजमुळे शरीरात प्रोटीनची कमतरता होते आणि पोटाच्या कॅन्सरची समस्या निर्माण होते.
2. पोट : पोटाच्या चारही बाजूला आलेली सुज पोटाच्या कॅन्सरचे आणि पोटाला टी.बी होण्याचे लक्षण असते.
3. डोळे : डोळ्यांवर आलेली सूज थायरोटाक्सिकोसिस आणि किडनीच्या आजाराचे संकेत देत असते.
4. हात : हातांवर येणाऱ्या सूजमुळे लिव्हर, किडनी आणि एडियोपॅथिक एडिमाचा त्रास होण्याची शक्यता असते.
5. नख : नखांच्या आजुबाजूला येणारी सूज फुप्फुसांच्या कॅन्सरचे लक्षण असते.
6. मान : मानेवर सूज येत असल्यास, पेस्कोस्ट्युमर हा आजार होण्याचा संकेत असतो.
7. जीभ : जीभेवर आलेल्या सूजमुळे एंजियोडिमा आणि थायरॅाईड होण्याची शक्यता असते.

पाहा बदाम का भिजवून खावेत


बदामावरच्या सालीवर टॅनीन नावाचं एक तत्व असतो जो बदामातील इतर पोषक तत्वांचं अवशोषण करण्यास रोकतो. बदामावरचं साल तसंच राहिल्यास त्याच्या तुमच्या शरीराला अधिक फायदा होत नाही. त्यामुळे त्यावरचं साल निघून जाणं अधिक महत्त्वाचं असतं.

बदामाचे फायदे.

१. भिजवलेले बदाम सकाळी खाल्ले तर त्यात औषधी गुणधर्म जास्त असतात. कोरड्या बदामांपेक्षा पाण्यात भिजवून खाल्लेले बदाम हे जास्त पौष्टिक असतात.
२. बदामांच्या सेवनाने सर्दी आणि पडसे कमी होते. रात्री झोपतांना भिजवलेले बदाम आणि गरम दूध घेतले तर सर्दी कमी होते.
३. बदामाने काही काळ भूक भागवली जाते.
४. डाएटिंग करणारी लोक अधिक प्रमाणात बदाम खातात. डाएटिंग करणारे भूक लागल्यास इतर पदार्थांपेक्षा १२ बदाम खातात. हे बारा बदाम एका ब्रेकफास्टचे काम करते.
५. बदामामुळे पोषक द्रव्ये मिळतात आणि कॅलरीजही वाढत नाहीत.
६. मधुमेह झालेल्या व्यक्तींनी बदाम खाल्ल्यास त्यांची शुगर लेवल नियंत्रणात राहते.
७. संशोधनादरम्यान स्पष्ट झालं की, दररोज मुठभर बदाम खाल्ल्यास हृद्याचे आजार कमी होतात. बदाम खाल्ल्यानं हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा रक्तप्रवाह नीट होतो. 
८. बदामामध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असते. जे रक्त शुध्दीकरण करण्यास उपयुक्त ठरते.
९. बदामामुळे कोरडी त्वचा असणार्‍यांना त्वचेचा स्निग्धपणा वाढवण्यास मदत होते.
१०. बदामाच्या सेवनाने केस गळण्याचे प्रमाणही कमी होते.

केस पांढरे होण्यापासून रोखण्यासोबत केसगळतीही थांबवेल हा रस


 हल्ली केस पांढरे होणे, केस गळणे ही समस्या साधारण बनलीये. व्यस्त आणि अनियमित लाईफस्टाईलमुळे केस पांढरे होणे, केस गळणे, कोंडा आणि इतर समस्या सतावतात. 
तसेच मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त शाम्पूचा वापर, तसेच सतत हेअर स्ट्रेटनिंग, हेअर ड्रायरचा मोठ्या प्रमाणात वापर यामुळे केसांचे आरोग्य बिघडते. केसांच्या या समस्यांसाठी कांद्याचा हा मास्क उपयोगी ठरतो. हा मास्क नियमितपणे लावल्यास 15-20 दिवसांत फरक जाणवतो. 

हेअर मास्क बनवण्याची कृती

एका कांद्याचे चार तुकडे करुन मिक्सरवर वाटून घ्या. कांद्याचा रसात अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण केसांना लावून 30 ते 40 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर शाम्पूने केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून तीन ते चार वेळा ही कृती करा. 15- 20 दिवसांत तुम्हाला फरक जाणवेल. 

आवळ्याच्या रसाने हे ६ आजार राहतील दूर


आवळ्याच्या रसाचे आरोग्यासाठी ६  फायदे
१. हृदय रोग होत नाही
२. वजन कमी करण्यास मदत होते
३. पचनप्रक्रिया सुरळीत होते
४. चेहरा चमकदार आणि डागमुक्त होतो
५.  मधुमेह नियंत्रणात राहतो
६.  डोळ्यांची दिसण्याची क्षमता वाढते

साबुदाण्याचे आरोग्यासाठी 8 प्रमुख फायदे


पांढरेशुभ्र दिसणारे अगदी छोट्या आकाराचा साबुदाणा आपण उपवासाला खातो. साबुदाणा वडे, खिचडी, हे पदार्थ प्रत्येकाला आवडतात.
उपवासाच्या दिवशी किंवा मन झाल्यावर आपण साबुदाण्याचे पदार्थ बनवून खातो. या छोट्या दिसणाऱ्या साबुदाण्याचे अनेक मोठे फायदे आहेत.
साबुदाण्याचे आरोग्यासाठी 8 प्रमुख फायदे
1. शरीरातील उष्णता नियंत्रणात राहते.
2. पोटाच्या समस्या दूर होतात.
3. ब्लड प्रेशरवर नियंत्रण राहते.
4. शरीराला ऊर्जा मिळते.
5. हाडं मजबूत होतात.
6. वजन वाढण्यास मदत होते.
7. लवकर थकवा येत नाही.
8. त्वचा चमकदार राहते.

आहारात मीठ प्रमाणात का असावं?


जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीच्या दररोजच्या आहारात ५ ग्रॅमपेक्षा जास्त मिठाचा समावेश असू नये... अन्यथा अशा व्यक्तींना उच्च रक्तदाबाची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते.   
दररोजचा आहार घेताना याकडे लक्ष द्या... 
- लोणची, पापड, सॉस, केचअप, अजिनोमोटो, खारवलेले पदार्थ, शेव चिवडा अशा खाऱ्या पदार्थांतून मोठ्या प्रमाणात मीठ पोटात जातं.
- आहारात मिठाचं प्रमाण मोठ्य़ा प्रमाणात असेल तर अन्न पचनाची प्रक्रिया बिघडण्याची शक्यता असते. 
- जठराचा कर्करोग, कॅन्सर अशा आजारांची शक्यता बळावते
- जेवणातही शिजवतानाच मीठ टाकावं... वरतून मीठ घेणं टाळावं

केळी खाण्याचे १० फायदे


१. दोन केळी खाल्ल्याने शरीराला पुढील ९० मिनिटांपर्यंत उर्जा मिळते. मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी सरावातील ब्रेकदरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते. 
२. अधिक तणाव जाणवत असल्यास केळी खावीत. 
३. ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास अथवा तुम्ही लवकर थकत असाल तर केळ्यांचे सेवन करावे. केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
४. परीक्षा देण्यासाठी जात असाल तर जरुर केळे खा. 
५. केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. केळ्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून घेते. यामुळे हाडे मजबूत होतात. 
६. केळ्यांमध्ये पोषक तत्वांचा खजिना असतो. यात पोटॅशियम, फॉलिक अॅसिड, व्हिटामिन ए, बी, बी६, आर्यन, कॅल्शियम असते.
७. जुलाबाचा त्रास होत असल्यास केळे खाणे उत्तम.
८. केळ्याच्या नियमित सेवनाने चयापचयाची क्रिया सुरळीत राहते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी राखण्यास मदत होते. 
९. रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम केळे करते. 
१०. अधिक मद्यपान केल्याने हँगओव्हर झाल्यास केळ्याचा शेक प्यायल्याने लवकर आराम मिळतो. 

संत्री खाण्याचे भरपूर फायदे


 फळे खाणे आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते. फळांमध्ये अनेक पोषक तत्वे असतात जी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पौषक तत्वांनी भरपूर असलेले फळ म्हणजेच संत्रे. रोज संत्रे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. 

दररोज संत्रे खाण्याचे फायदे

1. रोज एक संत्रे खाल्ल्याने दिवसभरात शरीराला लागणारे व्हिटामिन सी मिळते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. 
2. वाढत्या वयाप्रमाणेच त्याच्या खुणा शरीरावर दिसू लागतात. वाढत्या वयाच्या खुणा कमी कऱण्यासाठी दररोज ताज्या फळांचे सेवन करावे. दररोज संत्रे खाल्ल्याने त्वचा तुकतुकीत होते.
3. रोज संत्रे खाल्ल्याने हृदयरोगाशी संबंधित हार्ट अॅटॅक तसेच इतर आजारांचा धोका कमी होतो.
4. संत्र्यातील फोलेट आणि फॉलिक अॅसिडमुळे मेंदूचा विकास होण्यास मदत होते. गरोदर स्त्रियांनीही नियमित संत्रे खाणे चांगले.
5. संत्र्यामुळे केसगळती रोखण्यास मदत होते. 

डेंग्यू आणि चिकनगुनियापासून बचावासाठी बाबा रामदेवांचा घरगुती उपाय


दिल्लीसह राज्यातही चिकनगुनियाचं थैमान सुरु झालंय. डेंग्यूने देखील अनेक भागात डोकं वर काढलं आहे. योग गुरु बाबा रामदेव यांचं म्हणणं आहे की, चिकनगुनिया झाल्यास तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. यासाठी प्रिवेंटिव उपाय केले पाहिजे. ज्यामुळे तुम्ही या आजारांपासून लांब राहू शकता.
बाबा रामदेव यांच्यामते चिकनगुनिया त्या लोकांना होतो ज्यांचं इम्यूनिटी सिस्टम कमजोर असतं. या आजारामुळे ब्लड प्रेशर कमी होणे, प्लेटलेटची संख्या घटने, लीव्हर वीक होने या सारख्या समस्या उद्भवतात. या आजारांपासून बचाव होण्यासाठी डाळिंब, पपईचे पाने, कोरफड याचं सेवन करा.
डेंग्यू आणि चिकनगुनिया एकच डास चावल्यामुळे होतो. हा डास फक्त चांगल्या पाण्यावरच येतात. यामुळे कोठेही पाणी जमा नका होऊ देऊ. बाबा रामदेव म्हणतात की, डेंग्यू आणि चिकनगुनिया हे कमजोर लोकांनाच होतात. त्यामुळे खाणं चांगलं आणि योग्य असलं पाहिजे.

साखर जास्त खातं असाल तर या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष नको


साखर जास्त खातं असाल तर या ५ लक्षणांना दुर्लक्ष करु नका
१. नेहमी आजारी असणं- साखर जास्त झाल्यामुळे प्रतिकारक्षमता कमी होते.
२. वजन वाढणे- रक्तात साखरेच प्रमाण जास्त झालं की वजन वाढते.
३. तणाव आणि चिंता वाढणे- रक्तातील साखरेच प्रमाण कमी जास्त होत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते.
४. जास्त तहान लागणं- शरीरात पाण्याची कमतरता सतत जाणवते त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. 
५. दात दुखी- सतत गोड खाल्ल्याने दात खराब होतात. दातांच्या समस्या निर्माण होतात.

घरच्या घरी बनवा मसालेदार दूध


आपण रोज एक ग्लास साखर टाकून गरम दूध पितो. आता नुसतं कच्च आणि गरम दूध न पिता तुम्ही दुधाचा वेगळा स्वाद घेवू शकता. 
घरच्या घरी पौष्टिक मसालेदार दूध बनवण्याची सोपी कृती इथं पाहा आणि घरात नक्की प्रयत्न करा. हे दूध प्यायल्यानंतर दूध न आवडणाऱ्या लोंकाना सुध्दा दूध आवडायला लागेल.
                                                        घरच्या घरी बनवा मसालेदार दूध

घरच्या घरी बनवा स्वादिष्ट जीरा-आलू


साहित्य - 4 ते 5 बटाटे उकडून, त्याचे तुकडे करुन घ्या, एक चमचे जीरे, चिरलेली कोथिंबीर, 2 मिरच्या, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा लिंबाचा रस, दोन चमचे तेल, चवीपुरते मीठ
बनवण्याची कृती - पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात जिरे टाका. जिरे तडतडल्यानंतर त्यात मिरची टाका. नंतर त्यात उकडलेल्या बटाटाच्या फोडी टाका. 
या मिश्रणात अर्धा चमचा हळद, लाल मिरची पावडर आणि चवीपुरते मीठ टाका. सर्व मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या. चवीपुरता लिंबाचा रस आणि चिरलेली कोथिंबीर टाकून भाजी ढवळा आणि गरमागरम सर्व्ह करा. या भाजीसोबत तुम्ही पुरी अथवा चपातीही सर्व्ह करु शकता.