आयुर्वेदिक औषधे


आयुर्वेद (Ayurveda) हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधिविग्रह (आयुः) जीवन + विद्या (वेद) अशाप्रकारे होतो. आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो.

आयुर्वेदातील काही वनस्पती औषधांचे संदर्भ हे मुख्य चार वेदांपैकी एक असलेल्या अथर्ववेद या इसवी सनपूर्व सुमारे १२०० मध्ये रचल्या गेलेल्या वेदामधून घेतले आहेत. आणि त्यामुळे आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक समजला जातो. तथापि, विशेषतः गौतम बुद्ध यांच्या आणि त्यानंतरच्या काळात, आयुर्वेदामध्ये अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींची भर घालण्यात आली. समुद्रमंथनातून निघालेले भगवान धन्वंतरी (Dhanvantari) हे आयुर्वेदातील परंपरेनुसार आद्य वैद्य मानले जातात.

औषधी डाळींब







डाळींबात अनेक औषधी गुण आहेत. डाळींबाचा रस व खडीसाखर एकत्र करून घेतल्यास पित्त कमी होते. अपचन दूर होते आणि त्यामुळे निर्माण झालेला शौचाचा विकार बरा होतो.काविळीवरही हे एक चांगले औषध आहे. हृदयविकारामुळे छातीत दुखत असल्यास डाळींबाचा रस उपयोगी पडतो. डाळींबाचा रस, मध, साखर यांचे चाटण लहान मुलांचा खोकला बरे करते. फार बोलण्याने आवाज बसला असल्यास तो सुधारतो.


मधाचे औषधी उपयोग





दृष्टीदोष

डोळ्यांना दिसत नाही. लांबचे व जवळचे कमी दिसते. डोळ्यातून पाणी येते. पाणी गळू लागते, खुपऱ्या होतात, दृष्टीस अंधूकपणा असतो. अशा वेळी डोळ्यात नुसता मध घालवा अगर सुखरी हिरडा मधात उगाळून घालावा. यामुळे सर्व दृष्टीदोष नाहीसे होतात. दृष्टी फार लवकर सुधारते.

त्वचारोग

सारखी अंगास खाज सुटते, गांधी उठतात, खरबरीत होते, त्वचेवर पांढरेपणा उत्पन्न होतो. त्वचेची आग होते. अशा वेळी मध रोज घेणे हितकारक आहे. रोज वयोमानाप्रमाणे १ ते २ तोळे मध व पाणी एकत्र करुन घ्यावे. अंगकाठी सतेज होते.

श्वास खोकला

श्वासामुळे सारखा लागणारा दम, कफामुळे सारखा येणारा खोकला, खोकुन खोकुन पोटात दुखु लागते. कंबर वाकते. एक प्रकारची तोंडावर सूज येते. सारखा कफ पडतो. अशावेळी मध अगर त्रिफळा पूर्ण व मध एकत्र करुन घावे.

अतिसार

काही खाल्ले तरी वांती होणे. अशी सवय अनेकांना असते. म्हणून अन्न पचत नाही. त्यामुळे भुक चांगली नसते. वांति होईल या भितीने अन्नद्वेष. त्यामुळे निरूत्साह उत्पन्न होती. यावेळी मधाचा वापर अन्नात अवश्य करावा. त्यामुळे वांती होण्याची प्रवृत्ती कमी होते.

कृमी

लहान बालके, मोठी माणसे कोणासही कृमी होण्याची प्रवृत्ती असते. त्यांच्या शरीरात कृमींमुळे अन्नद्वेष उत्पन्न झालेला असतो. यावेळी मध घेत जावा. गॅस होणार्‍यास मध व लिंबू रोज द्या, ज्या व्यक्तिंना गॅसेस होतात. अशी तक्रार असते. भूक लागत नाही, उत्साह नसतो. काम करण्याची इच्छा नसते. कोणत्याही कामास कंटाळा येतो. नेहमी निरुत्साही वाटे. अशांनी रोज लिंबू रस (एक लिंबाचा) व मध एकत्र करून ते मिश्रण रोज सकाळी काही खाण्यापूर्वी घेत जावे.

कफ विकार

खोकल्याचा, दम्याचा त्रास ज्या व्यक्तीना होत असतो, त्यांनी मधाचा वापर आपल्या आहारात सतत करावा. त्यामुळे कफाचा जोर कमी होतो व अंगात उत्साह येतो.
मध हा काही आजार असला, आपणास कोणत्यातरी गोष्टीपासून उपद्रव होत असला तरच घ्यावा, असे नाही. चांगल्या व्यक्तींनी सुध्दा मधाचा वापर करावा. कारण मध हा आयुष्यवर्धक व वीर्यवर्धक आहे. त्यामुळे आरोग्यसंपन्न होण्यासठी तो शरीरास उपयोगी आहे.

पोटाच्या विकारांवर मध

रोज सकाळी एक पेलाभर थंड पाणी व चहाचे दोन चमचे मध एकत्र घेऊन चांगले एकजीव करुन घेणे. त्यामुळे पोटाचे विकार बरे होतात. डोकेदुखी, हातापायास ठणका, संधिवात यावर मध चांगले औषध आहे. भूकपण चांगली लागते. (लहान मुलास एक चमचा मध देणे.)

विविध व्याधींवर पिंपळी1



पोटाचे विकार - पिंपळी चूर्ण गुणकारी

पिंपळीचे औषधात अनेक उपयोग आहेत. पण विशेषत: दमा, खोकला व सर्व प्रकारचे वातविकार व कफरोग यांवर अत्यंत गुणकारी आहे. कफयुक्त खोकल्यावर पिंपळीचे चूर्ण तूप व मध द्यावे. मात्र ते सर्व विषम प्रमाणात द्यावे म्हणजे आराम वाटतो. जेवण झाल्यावर पोट जड वाटणे अथवा पोटास तडस लागत असेल व अन्नपचन होत नसेल, तर जेवणानंतर पिंपळीचे चूर्ण मधाशी खावे. तसेच पोटात वात धरुन शूल होत असेल, तर पिंपळीचे चूर्ण सैंधव, आल्याचा रस व थोडा मध यातून दिल्याने दुखने थांबते. भुक अजिबात लागत नसेल व बारीक ताप असेल तसेच तोंड बेचव असून मळमळ , तोंडाला पाणी सुटणे इत्यादी लक्षणे होत असतील तर नुसते पिंप्ळीचे चूर्ण गुळाबरोबर घेतल्याने हे विकार कमी होतात. पिंपळीचे चूर्ण नुसते न घेता त्याबरोबर सुंठीचे चूर्णही थोडेसे घेतल्यास लवकर गुण येण्यास मदत होते. दमा, खोकला, ह्र्दयाचे विकार, कावीळ, पांडुरोग इत्यादी रोगही या उपायाने बरे होतात. पिंपाळीचे चूर्णाचे दुप्पट गुळ घ्यावा असे वैदक शास्त्रात सांगितले आहे.

मध व पिंपळीने चरबी कमी होते

दात दुखणे, हालणे, ठणका लागणे इत्यादीसाठी पिंपळी, जिरे, व सैंधव यांचे वस्त्रगाळ चूर्ण करुन दांताच्या मुळाशी घासल्याने त्या तक्रारी कमी होतात. शरीरात स्थूलता फार वाढली असेल तर पिंपळीचे चूर्ण सतत काही दिवस मधाबरोबर घेतल्याने शरीरातील चरबी कमी होते व त्यापासून होणारा रोग बरे होतात.

चौसष्टी पिंपळीने दमा बरा होतो

पिंपळाचा उपयोग अनेक रोगांवर होतो. याशिवाय तिचे काही विशेष प्रयोगही शस्त्रांत सांगितले आहेत. त्यापैकी चौसष्टी पिंपळी, वर्धमान पिंपळी, पाचक पिंपळी इत्यादी काही होत. नुसत्या पिंपळीचा सतत चौसष्ट दिवस अहोरात्र खल करतात. तिलाच चौसष्टई पिंपळी म्हणतात. ती अतिशय तीव्र, उष्ण, अतिसुक्ष्म व तीव्र असते. म्हणून ती फक्त मुगाच्या डाळीइतकी तूपमध किंवा मध साखर अथवा वासावलेहातून दोन वेळा घेतल्याने अति जुनाट दम्याचा विकारही बरा होतो. तसेस पडसे, खोकला, अग्निमांद्य, अनिमिया, जीर्णज्वर, ह्रुदयाची अशक्तता इत्यांदीवर फार गुनकारी आहे. चौसष्ट दिवसांऐवजी फक्त चौसष्ट प्रहरच खल करतात. तिलाही चौसष्टी पिंपळीच म्हणतात. पण ती जरा सौम्य आहे. पण इतके असुनही उष्ण्ता वाढल्यास गेण्याचे बंद करुन तुप व दूध पुष्कळ प्रमाणात घेतल्याने पित्त कमी होते. फारच उष्णप्रक्रुतीच्या माणसांनी मात्र पिंपळीचा उपयोग जपूनच करीत जावा.

वर्धमान पिंपळीने अशक्तता जाते

गाईचे दूध चार तोळे, पाणी सोळा तोळे घेऊन त्यात तीन पिंपळ्या घालून सर्व एकत्र करून कल्हईच्या भांड्यात आटवावे. पाणी आटले म्हणजे त्यात खडीसाखर घालून त्यातील पिंपळ्या चावुन खाऊन ते दूध प्यावे किंवा थंड-उष्ण या प्रकृतिभेदानुसार पिंपळ्या खाव्यात किंवा त्या काढून टाकुन, नुसते दुध प्यावे. याप्रमाणे रोज एक पिंपळी याप्रमाणे सात दिवस वाढवीत न्यावे व पुन्हा सात दिवस रोज एक पिंपळी कमी करीत आणावी. यासव वर्धमान पिंपळी म्हणतात. यात पिंपळीचे प्रमाण व ती वाढविण्याचे दिवस यात बरेच प्रकार आहेत. पण सर्वसाधारणपणे वरील प्रमाणे घेतल्यास जरा उष्ण प्रकृतीसही मानवण्यास सोईचे होते. हिच्या सेवनाने जीर्ण ज्वर, पांडुरोग, गुल्म, उदर, अग्निमांद्य, खोकला, अशक्तता व वातरोग दूर होतात. प्रमेह रोगावरही ही गुणकारी.

अजीर्णावर घ्यावयाच्या पिंपळ्या

बरेच दिवसांचा अजीर्णाचा उपद्रव असेल तर पिंपळ्या लिंबाच्या रसात भिजत घालून त्यात सैंदवाचे चूर्ण घालावे. दोन-चार दिवस भिजल्यावर सुकवून ठेवाव्यात व त्यातून दोन तीन नित्य जेवणावर किंवा जास्त त्रास होईल तेव्हा चावून खाव्यात म्हणजे तोंडात रुचि घेऊन पचनास मदत होते.

पिंपळमुळाचे पाण्याने नारू जातो

पिंपळीचे गुणाप्रमाणेच पिंपळ मुळाचे गुण आहेत. पण त्यात काही विशेष गुण आएह्त. ते म्हणजे झोप येत नसेल तर पिंपळ मुळांचे चूर्ण गुळाबरोबर रात्री अथवा संध्याकाळी घ्यावे. म्हणजे झोप येते. तसेच ओकारीवर पिंपळमूळाचे वस्त्रगाळ चूर्ण करून त्यात त्याच्या बरोबरीने सुंठीचे चूर्ण घालुन त्यातून साधरणतः एक मासा दरवेळी मधातून चाटावे. म्हणजे ओकारी कमी होते. खोकल्यावरही या दोंहोच्या मिश्रणात थोडे बेहड्याचे चूर्ण मिसळुन मधाबरोबर अथवा कोमट पाण्याबरोबर घेतल्यास खोकला त्वरीत थांबतो. याशिवाय नारूवरही पिंपळमुळाचा अगदी सोपा उपाय सांगितला आहे. तो असा की, पिंपळगुळ थंड पाण्यात उगाळून प्याल्याने नारू बरा होतो. याप्रमाणे पिंपळगुळाचेहि अनेक औषधी उपयोग आहेत.

पिंपळमुळ

पिंपळीच्या झाडाच्या मूळाचा वापर पिंपळमूळ या नावाने होत. भूऱ्या खाती रंगाची ओबड धोबड मुळे काष्ठौषधींच्या दुकानात मिळतात. त्यांचा आकारमानावरून त्यांचा भाव ठरतो. पिंपळमूळ जुने झाल्यास त्याला पोरकिडा लागण्याची शक्यता असते. यामुळे ८-१५ दिवसांपेक्षा अधिक पिंपळमूळ आणून ठेवू नये.
इंपळमूळ हे अत्यंत तिखट अर्थात चव घेतल्यास जिभेच्या शेंड्याची, नाकाची चुणचुण करणारी, प्रसंगी घाम आणणारी असते. तिखट असूनही पिंपळमुळास एक सुगंध असतो. त्यामुळे पिंपळगुळाची उपयुक्तता मानसिक विकार, मतिमंदता, कफामुळे आलेले. हृदयविकार यांमध्ये दिसून येते. अतिशय तिखट असल्यामुळे पचनशक्ती वाढविणारे, साठून राहिलेली आव, पाचन करणारे, वाढलेल्या कफामुळे चोंदलेले नाक, जाड झालेल्या रक्तवाहिन्या, आतड्यांत बसलेला कफाचा लपेटा, डोकेदुखी, यकृताचा मार्ग बंद झाल्यामुळे झालेली कावीळ अशा सर्व विकारांत पिंपळगुळाचा उपयोग होतो.
मतिमंद मुलांमध्ये बऱ्याच वेळा सर्दी, लाळ गळणे, बोबडे बोलणे, अजिबात न बोलणे, सारखी लघवी होणे अशी लक्षणे असता पाव चमचा पिंपळगुळ व चिमूटभर वेखंड मधातून चाटवल्यास बालकाची कफ होण्याची प्रवृत्ती क्रमाने कमी होत मागे पडलेले बोलणे सुरू होऊ शकते

जाणून घ्या लेडीफिंगर (भेंडी)चे 10 कमालीचे फायदे

 लेडी फिंगर म्हणून ओळख असणारी हिरवी भाजी भेंडी , भाज्यांमध्ये बर्‍याच लोकांना पसंत येते, तर त्याला नापसंत करणारे लोक देखील असतात. पण भेंडीच्या या फायद्यांना जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच याचे सेवन कराल. जाणून घ्या भेंडीचे 10 अनमोल फायदे...
- भेंडीला आपल्या ताटात सामील करून तुम्ही कँसरला पळवू शकता. खास करून कोलन कँसरला दूर करण्यासाठी भेंडी फारच फायदेशीर असते. ही आतड्यांमध्ये उपस्थित विषारी तत्त्वांना बाहेर काढण्यास मदत करते, ज्याने तुमच्या आतड्या स्वस्थ राहतात आणि उत्तम प्रकारे काम करतात.
 

जाणून घ्या लिंबाचे फायदे


 लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत. लिंबु उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. 
पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा. 
अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. ते आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ) घालून निखाऱ्यावर गरम करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो. 
पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते. मेदवृद्धि म्हणजे लठ्ठपणा कमी करण्यासाठीही रोज लिंबाचा रस उन पाण्यात घालुन घेतल्याने उपयोत होतो. 
वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते. 
अंगाला कंड सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळावा व ऊन पाण्याने स्नान करावे. कंड कमी होतो.

No comments:

Post a Comment