सकाळचा नाश्ता कधी चुकवू नये, असे म्हटले जाते. आणि हे अगदी खरे आहे. आहारात सकाळच्या नाश्त्याला अत्यंत महत्त्व आहे. गरोदरपणात तर मातेवर बाळाचे भरणपोषण अवलंबून असल्याने उशिरा नाश्ता करणे किंवा नाश्ता करणे टाळणे बाळासाठी आणि आईसाठी त्रासदायक ठरू शकते.
अनेक गरोदर महिला ज्यांना मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतो अशा महिला नाश्ता करणे टाळतात किंवा उशिरा नाश्ता करतात. नाश्ता टाळण्याचे किंवा उशिरा करण्याचे कारण म्हणजे सकाळी मळमळ्यासारखे किंवा उलटीसारखे वाटते. बरेचदा मॉर्निंग सिकनेसमुळे उठून बसणे आणि नाश्ता करणे शक्य होत नाही.
परंतु, त्रास होत असला तरी देखील नाश्ता टाळणे योग्य ठरणार नाही. रात्री झोपल्यानंतर साधारण ९-१२ तास अन्न खाण्याला आराम असतो. त्यावेळेस तुमच्या शरीरात ऊर्जेचे स्त्रोत साठवलेले असतात. त्यामुळे शरीराची विविध कार्ये सुरळीत होतात आणि बाळाला पोषकघटकांचा पुरवठा देखील होतो. म्हणून, इतक्या वेळच्या अंतराने शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आणि बाळाला पोषकघटक मिळण्यासाठी नाश्ता करणे गरजेचे आहे.
मॉर्निंग सिकनेसमुळे जर नाश्ता करणे शक्य होत नसेल तर ज्यामुळे मळमळ होणार नाही असे पदार्थ खाण्यास प्राधान्य द्या. ज्यामुळे पोट भरेल, खाण्याचे समाधान मिळेल आणि मॉर्निंग सिकनेसला आळा बसेल असे पदार्थ खा. खरंतर, नाश्ता टाळण्यापेक्षा नाश्ता केल्याने मॉर्निंग सिकनेसवर मात करण्यास मदत होईल.
त्याचबरोबर नाश्ता केल्याने मेटॅबॉलिझम सुरळीत होण्यास, ब्लड ग्लुकोज, इन्सुलिन, फ्री फॅटी अॅसिड आणि ग्लुकोज नियंत्रित राहण्यास मदत होते. the Lancet journal च्या अभ्यासानुसार नाश्ता टाळणे विशेषतः गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात योग्य ठरणार नाही. तसंच खूप वेळ काहीही न खाल्यास अधिक भूक लागते आणि जास्त खाल्ले जाते. गरोदरपणात अधिक कॅलरीज घेणे त्रासदायक ठरू शकते.

- अशावेळी काय करावे?हलका नाश्ता करा. डिशभर पोहे, उपमा, इडली, डोसा खाणे योग्य ठरेल.
- सकाळी उठल्यावर पहिल्यांदा कोणतेही पेय घेऊ नका. त्यामुळे मळमळ वाढते.
- नाश्त्याला अधिक खाणे किंवा नाश्ता पूर्णपणे टाळणे, असे काहीही करू नका. कारण त्यामुळे तुम्हाला आळसावल्यासारखे वाटेल किंवा नाश्ता केल्यानंतर काही तासांतच शरीरातील साखरेचे प्रमाण वाढेल.
No comments:
Post a Comment