सुकामेवा खाणे चांगले असते, हेल्दी असते, हे आपण जाणतो. पण तो फारसा खाल्ला जात नाही. म्हणून, मधल्या वेळी लागणाऱ्या भुकेसाठी जंक फूड किंवा इतर अनहेल्दी पदार्थ खाण्यापेक्षा मूठभर पिस्ता खाणे फायदेशीर ठरेल.
कारण त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर्स आणि अँटिऑक्सिडंट असून पिस्ता नैसर्गिकरीत्या कोलेस्ट्रॉल फ्री असतो. म्हणून, रोस्टेड, खारवलेले पिस्ता तुम्ही खाऊ शकता.
१. हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते: हिमोग्लोबिनमुळे फुफ्फुसांकडून शरीराच्या इतर भागांना ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास मदत होते. व्हिटॅमिन बी ६ युक्त पिस्ता हिमोग्लोबिनच्या वाढीसाठी महत्त्वाचा ठरतो.
२. त्वचेसाठी उपयुक्त: पिस्ता खाणे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरेल. कारण त्यात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असल्याने एजिंग, यूव्ही किरणं यापासून संरक्षण होतं. त्याचबरोबर स्किन कॅन्सरला देखील आळा बसतो. पिस्ताचे तेल हे कोरड्या त्वचेसाठी मॉइश्चराईजर म्हणून वापरले जाते.
३. डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर: पिस्तामुळे फ्री रॅडिकल्स डॅमेज होण्यास आळा बसतो आणि त्यामुळे डोळ्यांच्या विविध आजारांपासून संरक्षण होते.
४. रोगप्रतिकारकशक्ती वाढते: पिस्तामध्ये असलेल्या व्हिटॅमिन बी ६ मुळे फक्त हिमोग्लोबिनची निर्मिती होण्यास मदत होत नाही तर रोगप्रतिकारकशक्ती देखील वाढते. व्हिटॅमिन बी ६ च्या कमतरतेमुळे इन्फेकशनशी लढण्याची शरीराची क्षमता कमी होते. म्हणून, दररोज पिस्ता खाणे फायद्याचे ठरेल.
५. स्थूलता कमी होण्यास मदत होते: कॅलरीज न वाढवता पोट भरण्यासाठी पिस्ता हा उत्तम आणि हेल्दी पर्याय आहे. पिस्तामुळे पोट भरलेले राहते. त्यामुळे इतर अनहेल्दी पदार्थ खाणे आपोआपच टाळले जाते. परिणामी स्थूलता कमी होण्यास मदत होते.
६. पचन सुधारण्यास मदत होते: मूठभर पिस्ता खाल्याने पचन सुरळीत होण्यास मदत होते. तसंच त्यातील व्हिटॅमिन बी ६, कॉपर, मॅग्नेशियम, फॉस्फरस यामुळे अन्नपचनाची क्षमता सुधारते.
No comments:
Post a Comment