उसाचा रस पिण्याचे हे आहेत तोटे

उसाच्या रसात कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखी पोषक तत्वे असतात. यामुळे हाडे मजबूत होतात तसेच दातांच्या समस्याही कमी होतात. उसाच्या रसाचे असे अनेक फायदे असले तरी काही लोकांसाठी हा रस नुकसानकारक ठरु शकतो. 
उसाच्या रसात मोठ्या प्रमाणात कॅलरी तसेच कार्बोहायड्रेट असतात. यामुळे वजन वाढू शकते. त्यामुळे जे वजन कमी करताहेत त्यांनी उसाचा रस पिऊ नये.
जर तुम्हाला डायबिटीजचा त्रास असेल तर ऊसाचा रस दूरच ठेवावा. यात साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे उसाच्या रसाचे सेवन कमी प्रमाणात करावे. 
तुमची ब्लड शुगर लेवल अचानकपणे वाढत असेल तर उसाच्या रसाचे सेवन करु नये. यामुळे ब्लड इन्फ्केशन होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. 
कफाचा त्रास असल्यास उसाचा रस पिणे टाळा. यामुळे कफाचा त्रास वाढतो. 

No comments:

Post a Comment