कशी ओळखाल गव्हाच्या पीठातील भेसळ


 गव्हाचं पीठ हे भारतीय जेवणातील एक महत्त्वाचा घटक आहे.
पण आजकाल त्यामध्येही भेसळ होत असल्याने आरोग्यदायी फायद्यांपेक्षा त्याचा त्रासच अधिक होतो.  म्हणूनच आहारतज्ञांकडून जाणून घ्या गव्हाच्या पीठातील भेसळ कशी ओळखाल ? 
गव्हाच्या पीठामध्ये बोरीक पावडर, खडूची पावडर,मैदा मिसळला जातो. त्याचे सेवन शरीराला अपायकारक ठरते.  
कशी ओळखाल भेसळ ? 
गव्हाच्या पीठात कोंडाच जास्त दिसत असेल तर ते पीठ घेऊ नका.  असे पीठ पाण्यात मिसळल्यास त्यामधील कोंडा पाण्यावर सहज तरंगेल. 
गव्हाच्या पीठात खडूची पावडर मिसळली असेल तर त्याची ओळख करण्यासाठी हायड्रोलिक अ‍ॅसिड वापरले जाते.  
काही वेळेस स्व खर्चाने लॅब टेस्ट करून तपासणी केली जाते. 
बाहेरून विकतचे पीठ घेण्यापेक्षा घरातच गहू दळण्याची काही सोय , यंत्र घेता का ? हे बघा. यामुळे तुमच्या शरीराला अपाय  होणार नाही.  

No comments:

Post a Comment