कढीपत्ता : सुंदर त्वचेचे रहस्य


 सुंदर दिसण्यासाठी आपण काय काय नाही करत. सुंदर दिसण्यासाठी आपण विविध ब्युटी प्रॉड्क्ट वापरतो. त्यावर भरपूर खर्चही करतो. मात्र त्याचे तितकेसे परिणाम दिसत नाही. मात्र तुम्हाला माहीत आहे का सुंदर त्वचेचे रहस्य तुमच्या घरातच आहे. कढीपत्त्याच्या सहाय्याने तुम्ही त्वचेचे सौंदर्य वाढवू शकता. 
कढीपत्त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास यामुळे सुंदरता वाढते. याच्या वापराने पिंपल्स तसेच सुरकुत्या कमी होतात.
यासाठी कढीपत्त्याची पाने रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ही पाने वाटून त्यांची पेस्ट बनवा. ड्राय स्किनसाठीही ही पेस्ट चांगली आहे. यामुळे चेहऱ्याला चमकही येते. 
या पेस्टने बॉडीला मसाज केल्यास त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. तसेच जर तुम्हाला डायबिटीजचा त्रास असल्यास कढीपत्त्याच्या पानांची पावडर करुन नियमित ३ ते ४ ग्रॅम सकाळी आणि संध्याकाळी घेतल्यास डायबिटीज कमी होतो. 

No comments:

Post a Comment