मधुमेह रोग्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता, अशा रुग्णांना शरीरावर जखम झाली तर ती जखमी भरून निघू शकेल... हे आत्तापर्यंत बऱ्याचदा शक्य होत नव्हतं आणि याच कारणामुळे अशा रुग्णांचे अनेकदा अवयव कापावे लागत होते.
उल्लेखनीय म्हणजे, मधुमेह रुग्णांच्या पायांना अनेकदा जखमा होत असतात. रक्तसंचार योग्य नसल्यानं या जखमा भरून काढणं शक्य होत नाही. त्यामुळे, या जखमांत संक्रमणाची (इन्फेक्शन) शक्यता जास्त असते... हे संक्रमण शरीरभर पसरू नये, यासाठी शरीराचा संक्रमित भाग बऱ्याचदा कापून काढावा लागतो. परंतु, आता मात्र हे टाळता येऊ शकेल.
कॅनडाच्या युनिव्हर्सिटी ऑफ मान्ट्रियल हॉस्पीटल रिसर्च सेंटरमध्ये स्नायू तज्ज्ञ ज्यां फ्रान्स्वा केलेर यांनी हा दावा केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशी एक पद्धत शोधून काढण्यात आलीय ज्यामध्ये शरीरातील पांढऱ्या पेशी लाल पेशींमध्ये बदलता येऊ शकतील, ज्यामुळे जखमा लवकर भरून येण्यासाठी मदत मिळेल.
लाल पेशी जखमा भरून काढण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. हा अभ्यास जर्नल ऑफ डर्मेटोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलंय.
No comments:
Post a Comment